The गडविश्व
मुंबई : नवाब मलिक यांना आज ईडीने मनी लाँड्रीग प्रकारणी तब्बल आठ तासांच्या चौकशी नंतर अटक केली. त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ९ दिवसांची ईडी कोठडी देण्याचा निर्णय दिला आहे.
हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कोठडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
ईडीच्या कस्टडीच्या काळात नवाब मलिक यांना औषधे आणि त्यांच्या घरातून जेवण मिळावे अशी मागणी नवाब मलिकांच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आहे.
