नक्षल्यांनी वाळू उत्खननात गुंतलेल्या वाहनांची केली जाळपोळ

1185

– ६ डंपर व दोन जेसीबीचा समावेश, परिरात दहशतीचे वातावरण

The गडविश्व
बिजापूर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 63 वरील मिंग आचल वस्तीमध्ये नक्षल्यांनी सोमवारी रात्रोच्या सुमारास वाळू उत्खननात गुंतलेल्या वाहनांची जाळपोळ केली आहे. सदर घटनेमध्ये वाहन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत अहिंसक कृती करणे सुरू केले आहे. सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्ग 63 वरील मिंगाचल वस्तीमध्ये व वाळू उत्खननात गुंतलेल्या ६ डंपर व २ जेसीबी मशीन पेटवून दिल्या. यात पूर्ण वाहन जळून खाख झाले.सदर सीआरपीएफ कॅम्प पासून अवघ्या दोन किलोमीटर आणि पोलिस स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच प्रस्थमाच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सर्व वाहने 90 टक्के जळाली होती. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here