नक्षल्यांनी माजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने केली हत्या

346

– पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचा संशय

The गडविश्व
सुकमा : नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत सुकमा येथे काल बुधवारी सायंकाळच्या सुमारास माजी उपसरपंचाची धारदार शस्त्राने हत्या केली. मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आढळून आला आहे. मांडवी देवा असे हत्या करण्यात आलेल्याचे नाव आहे. ते बांदा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच होते. कोंटा येथील बेस कॅम्पवर तो कुटुंबासह राहत होते.
प्राप्त माहितीनुसार, काल बुधवारी सायंकाळी मांडवी देवा उशिरा मासेमारीसाठी बाहेर पडला होता. इतर साथीदारांसोबत मासे पकडल्यानंतर तो घरी परतत असताना वाटेत 20 ते 25 नक्षल्यांनी त्याला घेरले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर तरुणाचा मृतदेह कन्हैयागुडाच्या मधोमध रस्त्यात टाकून पळून गेले. सदर घटनेची माहिती आज गुरुवारी सकाळी कोंढा पोलीस ठाण्याला मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुतदेह ताब्यात घेतला. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी नक्षल्यांनी त्याचे वडील आणि भावाचीही हत्या केली होती.
सदर हत्येने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
मांडवी देवा येथे मासेमारीसाठी गेलेल्या 4 पैकी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी सुरू असून पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले आहे. या प्रकरणाची माहिती संकलित करण्यात येत आहे. तरुण छावणीत असताना रात्री घडलेल्या घटनेची नोंद का झाली नाही, अशीही शंका उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here