नक्षल्यांनी घडवला आयईडी स्फोट : सीआरपीएफचे चार जवान जखमी

676

The गडविश्व
– जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करत आयईडीचा स्फोट घडवल्याची घटना आज घडली आहे. या घटनेत सीआरपीएफच्या डेप्युटी कमांडंटसह ४ जवान जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बिजापूरच्या मोडकपाल पोलीस स्टेशन हद्दीतील CRPF 153 बटालियन कॅम्प चिन्ना कोडेपाल मधील जवानांचे एक पथक आज मंगळवारी क्षेत्र वर्चस्वासाठी रवाना झाले होते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास मुरकिनार रोडवर नक्षल्यांनी आयईडीचा स्फोट केला.
या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान जखमी झाले असून, त्यांना तातडीने बिजापूर जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये डेप्युटी कमांडंट पलवान कुमार बिस्वास, एएसआय सदाशिव यादव, हेड कॉन्स्टेबल राजीव रंजन आणि कॉन्स्टेबल ओम प्रकाश यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सर्व जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here