नक्षल्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार, ३ जवान जखमी

1410
File Photo

– सावध पवित्रा घेत अचानक झालेल्या हल्ल्याला  जवानांचेही प्रत्युत्तर

The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन पासून १२ किमी अंतरावर असलेल्या सीआरपीएफच्या नवीन कॅम्पवर नक्षल्यांनी आज सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारात सीआरपीएफच्या सुरस्य बटालियनचे तीन जखमी जखमी झाल्याचे कळते आहे. तीनही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. अचानक हल्ला झाल्याने खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, चिंतागुफा पोलीस स्टेशन क्षेत्रातील एलमागुंडा येथे सीआरपीएफ कोब्रा बटालियनचा नवीन कॅम्प आहे. आज सोमवारी ६ वाजताच्या सुमारास या कॅम्पवर नक्षल्यांनी अचानक गोळीबार केला. एलमागुंडा येथे उघडलेले सीआरपीएफ द्वितीय बटालियनचे हे नवीन कॅम्प चिंतागुफापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे तर मीनपापासून सुमारे ५ किमी अंतरावर हे कॅम्प आहे, अशा परिस्थितीत नक्षल्यांनी या नवीन कॅम्पला लक्ष्य करत जवानांवर गोळीबार केला. मात्र जवानांनी सावध पवित्रा घेता प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता काळी वेळाने नक्षली घटनास्थळावरून पसार झाले . यादरम्यान सीआरपीएफचे ३ जवान जखमी झाले.
या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल हेमंत चौधरी, कॉन्स्टेबल बसप्पा आणि कॉन्स्टेबल ललित बाग हे जखमी झाले आहेत. सर्वांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जवान सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियनचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here