नक्षली हिडमाचे तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण

448

– सीआरपीएफ 151 व मुलुगु पोलिसांसमोर आत्मसमर्पण,रायफलही केली जप्त

The गडविश्व
सुकमा : एका नक्षलीने तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्रासह आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. माडवी हिडमा असे या नक्षलीचे नाव आहे. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सीआरपीएफ 151 बटालीयनचे कामांडंट प्रद्युमन कुमार सिंग, टूआयसी चरण मुनाखिया व मुलुगु पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यात आले.
मात्र नक्षली हिडमाच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांमध्ये संशय निर्माण झाला होता. ज्याचा पाच राज्यांचे पोलीस शोध घेत आहेत तो हा नक्षली आहे असे तेलंगणा पोलिसांचे म्हणणे होते तर छत्तीसगड पोलिसांनी या नक्षलीचे वर्णन एका गावातील लहान कॅडर नक्षली असे केले. ज्यावर किमान 10 हजार आणि जास्तीत जास्त 50 हजार इतकेच बक्षीस असू शकते. तसेच हा छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
अधिक तपासानंतर तेलंगणा पोलिसांनीही सदर नक्षली माडवी हिडमा (25) हा छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील थोंडामार्का गावचा रहिवासी आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तो नक्षली संघटनेच्या चैतन्य नाट्य मंडळीत सामील झाला आणि 2017 मध्ये हिडमा मिलिशियामध्ये सामील झाला.
तेलंगणातील नक्षली हिडमाच्या आत्मसमर्पणाच्या वृत्तानंतर तो जहाल नक्षली ‘माडवी हिडमा’ मानला जात होता मात्र तो जहाल नक्षली नसल्याचे छत्तीसगड पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एसपी सुनील शर्मा यांनी सांगितले की, तेलंगणात आत्मसमर्पण केलेला नक्षली हा छोट्या कॅडरचा आहे. अनेक मोठमोठ्या घटनांमध्ये सहभागी असलेला हा हिडमा नाही. वास्तविक, दोघांच्या नावात साम्य असल्याने संशय निर्माण झाला. आत्मसमर्पण केलेला नक्षली हा सुकमा जिल्ह्यातील थोंडामार्का गावचा रहिवासी आहे. तर जहाल नक्षली माडवी हिडमा हा सुकमाच्या जगरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीतील पूर्व गावचा रहिवासी आहे. जहाल नक्षलीचा शोध घेणे सुरू असल्याचेही एसपी शर्मा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here