The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत २३ सप्टेंबर २०२२ अन्वये धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता १५ ऑक्टोंबर २०२२ अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. मात्र आता शासन पत्र क्रमांक खरेदी ११ ऑक्टोंबर २०२२ अन्वये खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता २१ ऑक्टोंबर २०२२ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
जिल्हयातील सर्व धान व भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत ऑनलाईन पोर्टलवर (NeML) नोंद करावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.