धान खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेला २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ द्या : आमदार डॉ.देवराव होळी

225

– गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या मळणीला उशीर झाल्याने अजुनही धान शेतातच आहे त्यामूळे अनेक शेतकरी धान्य विक्री पासून वंचित राहिलेले आहेत. करिता शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्य शासनाला केली आहे. याबाबतचे निवेदन गडचिरोली तालुक्यातील शेतकर्‍यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांना आजच्या जनता तक्रार दरबारात दिले असता त्यांनी त्यावर लगेच मंत्र्यांना पत्र मेल केले.
यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस, वादळी पाऊस येत असून त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या धानाची मळणी योग्य वेळेवर होऊ शकली नाही. परिणामी त्यांना धानाची विक्री करता आली नाही.अजूनही धानाचे मळणी सुरूच असल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान शेतातच पडून आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी किमान एक महिन्याची संधी मिळावी याकरिता धान खरेदीच्या ऑनलाईन प्रक्रियेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगनजी भुजबळ ,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here