धानोरा : श्री. जे. एस. पी. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा समारोप

305

The गडविश्व
ता.प्र / धानोरा , ९ ऑक्टोबर : श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित, श्री. जे. एस. पी. एम. महाविद्यालय धानोरा येथे प्राणीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाचा ८ ऑक्टोबर २०२२ रोजी समारोप करण्यात आला.
यानिमित्याने महाविद्यालयात ‘वन व वन्यजीव संवर्धन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख वक्ते म्हणुन मुरुमगाव वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे उपस्थीत होते. तर सोबत महविद्यालयाचे भुगोल विभाग प्रमुख डॉ. हरिश लांजेवार प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पंकज चव्हान यांनी भुषविले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतीमेस अभिवादन करुन झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना वक्ते अविनाश भडांगे यांनी पृथ्वीच्या उत्पत्ती पासुन तर आजच्या निसर्ग निर्मितीची प्रक्रिया समजावुन सांगितली. भारतातील वने व वन्यजीव, त्यांचा होणारा -हास व त्याची कारणे, मानव- वन्यजीव संघर्ष, वन व वन्यजीव संवर्धनाची गरज, वन्यजीव संवर्धनात विद्यार्थ्यांची भुमिका, विविध वन कायदे या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. लांजेवार यांनी जलवायु परिवर्तन व निसर्गचा समतोल राखण्यात विद्यार्थ्यांची भुमिका यावर भाष्य केले. तर, डॉ. चव्हान यांनी मानवाचे अस्तित्व कसे वन्यजीवांवर अवलंबुन आहे हे सांगुन प्रत्येकाने वन्यजीव संवर्धनाची जबाबदारी घ्यावी असे आव्हान केले.
यावेळेस राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्य महाविद्यालयात आयोजीत रांगोळी, पोस्टर व फोटोग्राफी स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विजेत्यांना चषक व प्रशस्तीपत्र देउन गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धेत कु. स्नेहा कुमरे हिला प्रथम, कु. सोनम अलाम हिला दुसरे तर कु. करिना वरवाडे हिला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. पोस्टर स्पर्धेत विवेक शेडमाके ने प्रथम, कु. सोनम अलाम ने दुसरे व कु. रोषणी मडावी ने तिसरा क्रमांक पटकावला. फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम परितोषिक कुणाल नैताम याने तर द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमे आदर्श वाढई व फैजान पठाण यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. सोनम अलाम तर प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. मांतेशकुमार तोंडरे यांनी केले. बक्षिस वितरणाची जबाबदारी प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा. गीताचंद्र भैसारे यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे आभार कु. श्रद्धा मोहुर्ले या विद्यार्थीनीने मानले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. जम्बेवार मॅडम, प्रा. डॉ. किरमीरे, प्रा. डॉ. चुदरी, प्रा. डॉ. वाघ, प्रा. डॉ. गोहने, प्रा. डॉ. झाडे, प्रा. पुण्यप्रेड्डिवार, प्रा. वाळके, प्रा. डॉ. पठाडे व महविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here