धानोरा : राष्ट्रीय महामार्गावरील लेखा गावाजवळ दोन ट्रक फसल्याने वाहतुकीची कोंडी

3568

– वाहनाच्या लांबच लांब रांगा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा (Dhanora), १३ सप्टेंबर : गडचिरोली- धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठे खड्डे पडलेले असूनही संबंधित विभाग कुंभकर्णाची झोप घेत असून त्यामुळेच येथील खड्डे दुर्लक्षित असल्याने याच खड्ड्यात मागील आठवड्यात दुचाकीचा तोल जावून अपघात घडला व त्यानंतर ट्रक फसला तसेच काल १२ सप्टेंबर रोजी रात्रो दोन मोठी जडवाहक ट्रक एकाच ठिकाणी फसल्याने या महामार्गाची वाहतूक ठप्प झाली असुन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बुडाली. त्यामुळे याला जबाबदार कोण ? असा संतप्त प्रश्न लोक विचारीत आहेत .

गडचिरोली ते धानोरा मुरुमगाव हा राष्ट्रीय महामार्ग असुन या रस्त्यावर दिवस रात्र मोठी आणि अवजड वाहने चारचाकी वाहने, दोन चाकी, ट्रॅक्टर इत्यादी वाहने चालतात. सततच्या रहदारीने आणि पावसाच्या पाण्याने या मार्गावर लेखा गावाजवळ मोठमोठे भगदाड पडलेले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहण चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. अनेक वाहनधारक स्वताचा जिव मुठीत घेवूनच वाहण चालवितात. काल १२ सप्टेंबर ला रात्रो धानोरा कडून येणारे मोठे ट्रक आणि गडचिरोली कडुन जानारे अवजड ट्रक लेखा गावाजवळील खड्ड्याजवळ एकमेकाला क्राँस करताना दोन्हीही ट्रक एकाच ठिकाणी फसल्याने वाहतूक कोडी निर्माण झाली. यात मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. कारण दुसऱ्या कोणत्याही बाजूने वाहन काढता येणे शक्य नसल्याने कोणतीही वाहने जाणे शक्य नाही. विशेष म्हणजे याच मार्गाने संबंधित विभागाचे कर्मचारी दररोज गडचिरोली वरुण धानोरा येथे येतात. येथे फसलेल्या ट्रकमुळे वाहतूक विस्कळित झाली असून याचा फटका प्रवाशांना, लहान वाहनाना, मोठ्या वाहनाना बसताना दिसतो. तसेच लोकांना कमालीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर याच खड्ड्यामुळे अपघात ल सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे संबंधित विभागावर गुन्हे का दाखल करु नये असा प्रश्न लोक विचारीत आहेत.
धानोरा वरून गडचिरोली, गडचिरोली वरून धानोरा, मुरुमगाव, छत्तीसगड ला वाहने दिवस रात्र चालतात. कर्मचारी, विद्यार्थी, अधिकारी, व्यापारी येजा करतात तरी संबंधित विभागाने वेळीच दखल घेवुन खड्डे बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलि आहे. राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याचे वृत्त वारंवार वृत्तपत्रांमधून लावून सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजून किती लोकांचे अपघात होऊन बळी घेण्याचे वाट पाहत आहे , बळी घेतल्यावरच याकडे लक्ष देईल का ? अजून पर्यंत या समस्येची दखल कुणीही घेतली नाही ही शोकांतिकाच म्हणावे लागेल.

(Gadchiroli, Dhanora, lekha)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here