धानोरा : रांगी येथे विद्युत उपकेंद्र द्या

325

– परिसरातील नागरिकांची मागणी

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १९ जुलै : तालुक्यातील १८ किमी अंतरावर असलेले रांगी हे गाव तालुक्यात महत्त्वाचे आहे. येथे धानोरा (Dhanora) येथुनच जंगल परिसरातून विज पुरवठा केला जाते मात्र रांगी परिसरात नित्यनेमाने दिवसातून १० ते १५ वेळा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे रांगी येथे विद्युत उपकेंद्र देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रांगी (Rangi) परिसरातील वीज समस्या सुटावी यासाठी येथे विद्युत उपकेंद्र गरजेचे आहे. त्याशिवाय येथील आणि परिसरातील वीज समस्या सुटणार नाही असे जनतेचे म्हणणे आहे. रांगी येथे दर बुधवारला आठवडी बाजार भरतो, अनेक व्यवसाय, प्रतिष्ठानने ,राईस मिल, आटा चक्की व इतर दुकाने, बँक येथे आहेत. अनेक दुकाने विजेवर चालणारी आहेत त्यामुळे रांगी येथे परिसरातील नागरिकांची वर्दळ असते. अनेकदा दिवस -रात्र वीज नसते. अशावेळी कामानिमित्याने आलेल्या व्यक्तींना रिकाम्या हाती परतावे लागते. रांगी गाव व परिसराला पुर्ण वेळ विजेची गरज असतांनाही पुष्कळदा वीज नसते. म्हणूनच महावितरण कंपनीने रांगी येथे विद्युत उपकेंद्र मंजूर करावे. जेणेकरून वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे जनतेला त्रास होणार नाही . सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसातून अनेकदा आणि रात्रीही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. कधी कधी रात्रभर वीज नसते. मात्र दर महिन्याला भरमसाठ बिल पाठविले जाते. वीज पुरवठा नियमित नसने म्हणजे आर्थिक लुटीचाच प्रकार असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करतांना दिसतात.येथील खंडित विद्युत पुरवठा दुर करण्यासाठी विद्युत् उपकरण आवश्यक आहे आणि निश्चितच याचा फायदा रांगी परिसरातील लोकांना होईल त्यामुळे रांगी येते विद्युत उपकेंद्र देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here