धानोरा येथे सीआरपीएफ बटालियन ११३ च्या वतीने बुद्ध जयंती साजरी

582

The गडविश्व
धानोरा : येथील सीआरपीएफ बटालियन ११३ मुख्यालयात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ११३ बटालियनचे कमांडंट जी.  डी. पंढरीनाथ यांनी महामानव तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती अगरबत्ती पेटवून त्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले, त्यानंतर बटालियनच्या सर्व सैनिकांनी महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात सीआरपीएफ ११३ बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनावर सखोल माहिती दिली.  त्यानंतर बटालियनचे कमांडंट जी.डी. पंढरीनाथ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तथागत गौतम बुद्धांचे जीवन, त्यांनी दिलेला शांतीचा संदेश आणि शिकवण याविषयी सैनिकांना समजावून सांगितले आणि त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गावर चालत आपण आपले जीवन सुखी करू शकतो असे सांगितले.
यावेळी शिपाई प्रशांत यांनी भजना द्वारे महात्मा गौतम बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले.
त्यानंतर भंडारा आयोजित करण्यात आला. बटालियनचे सर्व सैनिक आणि अधिकारी एकत्र बसून भंडारा खाल्ला.
या कार्यक्रमात ११३ बटालियनचे कमांडंट श्री जी.डी.  पंढरीनाथ यांच्यासह  द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंग, आणि बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पुरोहित आणि सर्व अधिकारी आणि सर्व जवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here