The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १ नोव्हेंबर : भारताचे लोहपुरुष स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त धानोरा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ११३ बटालियनच्या मुख्यालयातही राष्ट्रीय एकता दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहण्यात आली आणि भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. ज्यामध्ये ११३ बटालियन च्या जवान/अधिकारी द्वारा राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जनमानसात जागृती व देशभक्ती वाढावी यासाठी ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ०७ ते ०८ या वेळेत रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते. बटालियनमध्ये विविध ठिकाणी तैनात असलेले जवान/अधिकारी कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले आणि वरील कार्यक्रमाच्या शेवटी, दलातील सर्व सदस्यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जसवीर सिंग, कमांडंट ११३ बटालियन यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी/अधीनस्थ अधिकारी आणि जवानांना शुभेच्छा देताना त्यांच्या भाषणात त्यांना राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी स्वत:ला झोकून देण्यास प्रोत्साहित केले आणि ते म्हणाले की, कोणताही देशाची ताकत ही सर्व देशवासी यांच्या एकात्मतेत, परस्पर बंधुत्वाच्या भावनेत असते आणि तो देश मोठा आणि विविध धर्म, भाषांच्या लोकांचा असेल तर त्यांना एकात्मतेच्या धाग्यात बांधून ठेवणे कठीण असते. परंतु आपल्या भारत देशाची ही विशेषता आहे की इतके धर्म, पंथ, जाती असूनही लोक एकत्र राहतात आणि देशाची एकता टिकवून ठेवतात ही भारताची ताकत आहे. सरतेशेवटी, राष्ट्रीय एकता दिनाचा हा मूलभूत संदेश देशवासीयांमध्ये पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान बटालियनचे सेकंड कमांडिंग ऑफिसर हरिशंकर तिवारी, डेप्युटी कमांडंट एम.जे. रीजन, डेप्युटी कमांडंट गुलाब सिंग आणि सुभेदार मेजर रत्ना प्रसाद आणि अधीनस्थ अधिकारी व जवान उपस्थित होते.