धानोरा : मुनघाटे महाविद्यालयात राइस अभ्यास मंडळांतर्गत कार्यशाळा संपन्न

91

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ८ ऑक्टोबर : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था अंतर्गत श्री जिवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राइस अभ्यास मंडळाअंतर्गत ६ ऑक्टोबर ला एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ नंदाजी सातपुते राज्यशास्त्र विभाग प्रमुख महिला महाविद्यालय गडचिरोली, प्राध्यापक डॉ प्रमोद बोधाने प्राध्यापिका डॉ रजनी वाढई पीजीटीडी समाजशास्त्र विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच प्राध्यापक डॉ पंढरी वाघ, प्राध्यापक डॉ राजु किरमीरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण व दिप प्रज्वलित करुण विद्यापीठ गीताने करण्यात आली.
या कार्यशाळेत उपस्थित मान्यवरांनी सामाजिक संशोधन पद्धतीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संशोधनाचा विषय कसा निवडावा, संशोधनाच्या पद्धती , गाईड यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. या प्रसंगी गोंडवाना विद्यापीठात विद्या परीषेदेवर निवडून आलेले डॉ नंदाजी सातपुते यांचा राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बोधाने सरांचा इतिहास विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला तर डॉ रजनी वाढई मॅडम यांचा समाजशास्त्र विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजु किरमीरे, सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश बनसोड तर आभार डॉ पंढरी वाघ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. गणेश चुदरी, डॉ विणा जंबेवार मॅडम, डॉ हरीष लांजेवार, डॉ.सचिन धवनकर, डॉ प्रियांका पठाडे, प्रा. नितेश पुण्यप्रेड्डीवार व विद्यार्थ्यांनी सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here