धानोरा : प्रवासी वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

2353

The गडविश्व
धानोरा, १८ स्पटेंबर : तालुक्यातील येरकड-मालेवाडा मार्गावरील सुरसुडी-मुरमाडी या गावा दरम्यान प्रवासी वाहनाने रस्त्याच्या कडेला गुरे ढोर चारत असलेल्या वृध्द महिलेला धडक दिली असता महिला जागीच ठार झाल्याची घटना शनिवार १७ सप्टेंबर रोजी घडली. युमुना दयाराम मेश्राम (५०) रा. मुरमाडी असे अपघात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा ते कुरखेडा मार्गाने प्रवासी घेवून जाणारे एमएच ३३ ए ४८०१ हे प्रवासी वाहन धानोरा येथून प्रवासी भरून कुरखेडा येथे जात होते. येरकड-मालेवाडा मार्गावर असलेल्या सुरसुडी-मुरमाडी या गावा दरम्यान वृध्द महिला ही रस्त्याच्या कडेला उभी राहुन गुरे ढोर चारत होती यावेळी अचानक वाहन दिसल्याने तीची तारांबळ उडाली , वाहन चालकाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती वाहनाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातादरम्यान वाहनाने महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघात होताच वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातादरम्यान मात्र वाहनात असलेल्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. घटनेची माहिती प्राप्त होताच मालेवाडा पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here