धानोरा : पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईप लाईनचे पाईप अज्ञात व्यक्तीने लांबविले

422

The गडविश्व
धानोरा, १९ सप्टेंबर : स्थानिक नगर पंचायत अतंर्गत शहरातील पाण्याच्या जलकुंभाला पाणी पोहचवणाऱ्या पाईप लाईनचा पाईपच चोरीला गेल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकाराने गावातील पाणी पुरवठाच बंद पडलेला आहे. मुख्य पाईप लाईनचे पाईपचे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
धानोरा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी विहीरीचे बांधकाम केलेले आहे. याच विहिरीतुन पाणी गावातील जलकुंभात पाईपलाईनद्वारे टाकले जाते. याच पाइप लाईनचा अंदाजे २० फुटाचे पाईप अज्ञात चोरट्यानी चक्क जमिनीतुन काढून कापुण काढून लाबविले त्यामुळे धानोरा येथील नळाचा पाणी पुरवठा बंद पडलेला आहे. सदर पाईप चोरीला गेल्याची घटना १७ सप्टेंबर ला रात्रोच्या सुमारास घडली. येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईप लाईन चा पाईप चोरीला गेला गेल्याची माहिती काल रविवारला सकाळच्या सुमारास नगरपंचायत कर्मचारी उमेश जांगी हे टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना पाईप लाईन फूटली असल्याचे लक्षात आले. सदर बाब नगरपंचायतचे वरीष्ठ कर्मचारी गुलाब ठाकरे यांना सांगितले व पाणीपुरवठा सभापती माणिकशाह मडावी, नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम आणि उपाध्यक्ष यांच्या लक्षात आणुन दिले. मात्र धानोरात पाईप चोरी करणारा अज्ञात व्यक्ती कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here