धानोरा : दुचाकीच्या अपघातात एकजण ठार

973

– दुसरा जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : दुचाकी वाहनाची सिमेंटच्या बाकाला धडक बसल्याने अपघात होऊन एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार १६ ऑक्टोबरला मध्यरात्री १२ ते १ वाजताच्या सुमारास शहरातील स्टेट बँकेसमोर घडली.
आकाश राजेंद्र नरोटे (२५) रा. रामनगर वार्ड क्रमांक १९, गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे, तर इस्माईल पठाण (२४) रा. इंदिरानगर, गडचिरोली असे गंभीर जखमीचे नाव आहे.
आकाश आणि इस्माईल हे दोघे युवक एमएच ३३ एइ ४४८५ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीकडे जात होते दरम्यान दुचाकीवरील संतुलन बिघडल्याने दुचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बाकाला धडकली.
यावेळी दोघांनाही धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान रात्रो आकाशचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी इस्माईल ला गडचिरोली येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. अधिक तपास धानोरा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here