धानोरा : ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने काकडयेली नजीक अपघात

239

– जीवितहानी टळली
The गडविश्व
ता.प्र / धानोरा (Dhanora), १६ ऑक्टोबर : तालुका मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या काकडयेली नजीक आज १६ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास छत्तीसगडमार्गे गडचिरोली जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. सुदैवाने या अपघाता जिवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसा आज रविवार १६ ऑक्टोबर २०२२ ला पहाटेच्या सुमारास सीजी १९ बीपी ७७४१ क्रमांकाचा ट्रक छत्तीसगड वरून गडचिरोलीला जात होता. दरम्यान पहाटे ३ वाजताच्या सुमारास चालकाचा डोळा लागल्याने नियंत्रण बिघडून ट्रक काकडयेली या गावाजवळील तलावामध्ये जाऊन घुसला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित आणि झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here