The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ५ नोव्हेंबर : तालुक्याकरिता ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे ३० खाटांचे रुग्णालय आहे. त्या ठिकाणी श्रेणी वर्धन करून ५० घाटांच्या इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकाला नुकताच प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे. तसे पत्र आरोग्य सेवा संचालन यांनी काढलेला आहे.
धानोरा तालुका अति दुर्गम असून तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेत आणि दळणवळणाच्या साधनाचा अभाव याचा विचार करुण परिसरातील लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरवणे शासनाचे कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक सुसज्ज इमारत तयार करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला असता सदर प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे.
३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला श्रेणी वर्धन करून ५० खाटाचे उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास सन २०२० – २१ च्या दरसूची वर आधारित या अंदाजपत्रकामध्ये फ्युल गॅस पाईप, बायो डायजेस्टर, रेन वॉटर , हार्वेस्टिंग, सौर छप्पल, फर्निचर , विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मल निस्सारण,आग प्रतिबंधक इत्यादीसाठी तरतूद करण्यात आलेले असून त्याचे अंदाजे किंमत ८७३.२७ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रक आराखड्याला काही अटी व शर्तीच्या आधी राहून महाराष्ट्र शासन निर्णय घेत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. अंदाजपत्रकामध्ये विविध सुविधा बाबत तरतूद करण्यात आलेल्या आहेत.त्यासाठी अंदाजे ८७३.२७ लक्ष इतक्या रकमेचे अंदाजपत्रक आराखड्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे . सध्या असलेले ग्रामीण रुग्नालय तालुक्यातील जनतेस अपुरे पडत आहे. प्रशासकीय बांधकामाकरिता खर्च मागणी अवर सचिव महाराष्ट्र शासन यांनी ३ नोव्हेंबर २०२३ महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने काढलेल्या शासन परिपत्रकात देण्यात आलेली आहे
