धानोरा : कोट्यावधी रुपये खर्च केलेल्या रस्त्याची दोन महिन्यातच दुरावस्था

778

– मुसळधार पावसाने रस्त्याची पोलखोल
The गडविश्व
ता. प्र / धानोरा , १३ ऑगस्ट : तालुक्यातील मुंगनेर -पेंढरी रस्त्याचे बांधकाम कोट्यावधी रुपये खर्च करून दोन महीन्यापूर्वी करण्यात आले. परंतु मुसळधार पावसाने सदर रस्त्याचे बांधकाम किती मजबूत आहे त्याचा खरा चेहरा मुसळधार पावसाने दाखवून दिला आहे. दोन महिन्यांतच कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर पाऊस पडताच येथील डांबरीकरण उखडले असून ठीक ठिकाणी खड्डे पडलेले असल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून खर्च केलेले कोट्यावधी रुपये पाण्यात वाहून गेल्याची टीका नागरिक करीत आहेत.
मुंगनेर-पेंढरी मार्गावरील ३३ कि.मी.चे बांधकाम करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकदा केली. त्यानंतर शासनाने सदर बांधकाम खाजगी कंत्राटदारांना दिले. त्यानी अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी बांधकाम केले आणि पहिल्याच पावसात रस्त्याची दुरवस्था समोर आली. त्यामुळे रस्त्यांच्या बांधकामावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत असून संबंधित विभागावर कारवाई करण्याची मागणी आम जनतेतून केले जात आहे.मागील अनेक वर्षापासून धानोरा -चवेला- मुंगनेर- पेंढरी रस्ता दळवणासाठी उपयुक्त नव्हता. हा रस्ता धानोरा तालुक्याच्या मुख्यालयापासुन छत्तीसगड राज्याला जोडत असून या मार्गात अनेक गावाचा समावेश असल्याने हा रस्ता सर्वसामान्य जनतेसाठी फार उपयुक्त आहे. रस्त्यात येणारी अनेक गावे कित्येक वर्षापासून पाठपुरावा करून विविध माध्यमातून या रस्त्याची मागणी सर्वप्रथम आदिवासी जनतेने केली होती. यामध्ये बँक, कार्यालयीन कामे, आरोग्य सेवा, शिक्षणाच्या सोयी करिता इतर मूलभूत सुविधा सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी मोठ्या काटकसरीने ३३ किलोमीटरच्या मजबुती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यामध्ये रस्ता खडकीकरण, डांबरीकरण, मोरि बांधकाम, छोटे पूल बांधकाम, नाणी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. या रस्ताच्या कामाला सुरुवात करण्यात आली. जवळपास ३० किलोमीटर अंतराचा रस्ता सहा महिन्यात पूर्ण करण्यात आला मात्र कालांतराने काम पूर्ण होऊन दोन महिने होत नाही तोच पहिल्या पावसात रस्ता वाहून गेल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा वाजला. सरकारचे कोट्यावधि रुपये शासनाने देऊन पक्के रस्ते बांधकाम करण्यासाठी ही योजना राबवली जात असली तरी कच्चे रस्ते बनवण्यासाठीच ही योजना राबवली जाते का ? असा प्रश्नही विचारला जात आहे. चक्क मोहरी बांधकाम पूर्ण वाहून गेल्याचे दिसुन येते. सदर कंट्राटदराने याच आठवड्यात पाईप नेऊन रस्ता कसाबसा सुरू करून दिला. सदर काम मेहता कंट्रक्शन कंपनी नागपूर यांचे असल्याचे समजते. या मार्गाची पाहणी करण्याकरिता कोणत्याच अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याचेही समझते. एका पावसात रस्ता वाहून जात असेल तर त्याच्या दर्जा कसा असेल हे कळायला संबंधित विभाग दुधखुळा नाहीच. कामाची गुणवत्ता जर चांगली असती तर आज ही परिस्थिती आली नसती. संबंधित विभागाने योग्य ती चौकशी करुण कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

हा रस्ता अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित झालेला नाही. किमान पाच वर्षे या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम संबंधित कंत्राटदारालाच करायचे आहे.
– ओंकार वाशिकर
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धानोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here