धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना

115

The गडविश्व
गडचिरोली, १६ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्हयातील धनगर समाजाच्या नवउद्योजक महिलांना सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील महिलांकरीताच्या सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांचे हिस्यामधील २५ टक्के मधील जास्तीत जास्त १५ टक्के मर्जिन मनी उपलब्ध करुन देण्यास ( Front Subsidy) देण्यास इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती ,विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या दि. ०६ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयाव्दारे मान्यता देण्यात आली आहे.सदर योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच योजनासंबंधाने अधिक माहितीसाठी कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली या ठिकाणी संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here