धक्कादायक : सिलेंडरचा स्फोट, आईसह चिमुकलीचा आगीत होरपळून मृत्यू

440

The गडविश्व
यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरात असलेल्या मायलेकीचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काजल विनोद जयस्वाल (३०) असे आईचे तर वैभवलक्ष्मी जयस्वाल (५) असे मृत झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.
सकाळच्या सुमारास विनोद जैयस्वाल यांच्या घराच्या छपराला आग लागली. या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यादरम्यान घरात असलेल्या आई काजल विनोद जयस्वाल व पाच वर्षीय चिमुकली वैभवलक्ष्मीच होत्या. या आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू झाला. काजल जयस्वाल या गर्भवती आल्याची माहिती आहे. त्यामुळे या आगीने तिघांचा जीव घेतला आहे. घटनेच्या वेळी मृत काजलचे पती विनोद जयस्वाल हे धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी पदयात्रेवर गेले होते. सदर आग घरात असलेल्या किरकोळ विक्रीसाठीच्या पेट्रोल साठ्यामुळे भडकल्याचे बोलल्या जात आहे. या आगीत संपूर्ण घराची राखरांगोळी झाली. घटनेची माहिती होताच ग्रामस्थानी जमेल तसे पाणी फेकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र मयलेकींना आगीतून वाचवता आले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल ला पाचारण करण्यात आले होते. सदर घटनेत मायलेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here