धक्कादायक : नक्षल्यांनी पेरून ठेवलेल्या प्रेशर बॉम्ब चा स्फोट, महिला गंभीर जखमी

1798

– पोलीसांना लक्ष करीत पेरून ठेवण्यात आला होता प्रेशर बॉम्ब
The गडविश्व
बिजापूर, ९ सप्टेंबर : पोलीसांना लक्ष करण्याच्या उद्देशाने पेरून ठेवलेल्या प्रेशर बॉम्ब चा स्फोट झाल्याने महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना बिजापूर जिल्हयातील गलगाम या नक्षलग्रस्त गावात घडली. सदर महिलेच्या शरीरावर विविध भागात गंभीर जखाम झाल्या असून उपचाराकरिता बिजापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती आहे.
बिजापूर जिल्हयातील नक्षलग्रस्त गलगाम या गावात सिआरपीएफ कॅम्पपासून भुसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नक्षल्यांनी प्रेशर बॉम्ब पेरला होता. काल गुरूवारी संध्याकाळी उशिरा याच परिसरात राहणारी माहिला पायी गावाकडे जात असतांना अचानक महिलेचा पाय प्रेशर बॉम्ब वर पडला आणि स्फोट झाला. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोळयाला,पायाला आणि शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून सीआरपीएफचे जवान घटनास्थळी पोहचून महिलेला कॅम्प मध्ये नेले व सीआरपीएफच्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून बिजापूरच्या रूग्णालयात दाखल केले. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या परिसरात शोधमोहीम वाढविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here