– नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरातील घटना
The गडविश्व
नागपूर : येथील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरामध्ये जळालेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतक तरुणीची ओळख पटलीअसल्याचे कळते. सदर घटनेबाबाबत पोलीस अधिक तपास करीत असून तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला की तिला जिवंत जाळण्यात आले याबाबत अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान सदर तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार अगोदरच कुटुंबीयांनी पोलिसात दिली होती. मात्र काल संध्याकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत एक मैदानात आढळला. निकीताची निर्घृणपणे हत्या का करण्यात आली, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.