धक्कादायक : चंद्रपुरात निर्घृणपणे खून, शीर केले धडावेगळे

1297

– परिसरात खळबळ, भीतीचे वातावरण
The गडविश्व
चंद्रपूर, ८ नोव्हेंबर : जिल्हा मुख्यालयात एका इसमाचा निर्घृणपणे खून करून शीर धडावेगळे केल्याची खळबळजनक घटना ७ नोव्हेंबर रोजी रात्रो ९.३० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडली. महेश मेश्राम (३५) रा. दुर्गापूर असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटना दुर्गापूर मेन रोड वर घडली असून महेश मेश्राम यास अगोदर मारहाण केली त्यानंतर १० ते १५ जणांनी त्याचा मिळून धारदार शस्त्राने खून केला. खून एवढा भयावह करण्यात आला की खुन करणाऱ्या आरोपींनी त्याचे शीर धडावेगळे केले. रक्ताच्या थारोळ्यात महेशचा मृतदेह रस्त्यावर पडलेला होता तर धडापासून शीर हे ५० मीटर अंतरावर होते अशी माहिती आहे.
महेशचा खून कोणत्या कारणाने करण्यात आला हे कळू शकले नाही मात्र मृतक महेश मेश्राम याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते व नुकताच तो कारागृहातून बाहेर आला होता अशी माहिती आहे. तर घटनेनंतर काही आरोपीनी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केल्याचीही कळते. सदर घटना ही पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर घडली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे मात्र धिंडवडे उडाले आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

#chandrpur news #murder #chandrpur crime #mh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here