धक्कादायक : गुजरातमधील नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला, अनेकांचा मृत्यू

1101

The गडविश्व
गांधीनगर, ३१ ऑक्टोबर : गुजरातच्या मोरबी येथील मच्छु नदीवरील झुलता पूल रविवार सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान पाण्यात कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून मृतकांचा नेमका आकडा कळू शकला नाही. तर या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याचे असून उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले रात्रो उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.
रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान मोरबी येथील झुलता पूल नदीत कोसळला या दरम्यान अनेकजण पुलावर होते. अचानक पूल नदीत कोसळल्याने एकच तारांबळ उडाली होती. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी सुद्धा झाले आहेत. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती असेही कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली मदत

दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

”पंतप्रधान  @narendramodi यांनी मोरबी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या  प्रत्येकाच्या वारसाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून  २ लाख रुपयांची तर जखमींना  ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here