The गडविश्व
उस्मानाबाद : परिक्षा केंद्रात कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले व एक वर्षासाठी निलंबितही करण्यात आले. या तणावात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उस्मानाबाद येथून उघडकीस आली आहे. स्वप्नील फुलचंद ढोबळे (21) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो समुद्रवाणी येथील रहिवासी आहे.
कोरोनाकाळात ऑनलाईनच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर सरकारने सर्व प्रकारची निर्बंध हटवली आहे. यामुळे परीक्षादेखील ऑफलाईन स्वरुपात घेतल्या जात आहेत. स्वप्नील हा येडशी येथील ऍग्री कल्चर महाविद्यालयात कृषी पदविकेचे शिक्षण घेत होता तो डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. सध्या परीक्षा सुरू असल्याने तो पेपर देण्यासाठी येडशी येथील आपल्या महाविद्यालयात गेला होता. यावेळी परिक्षा केंद्रात त्याला कॉपी करताना परीक्षा विभागाच्या पथकाने पकडले. ही घटना २६ मे रोजी घडली. यानंतर कॉपी करताना पकडल्याने त्याला एक वर्षासाठी निलंबितही करण्यात आले. यानंतर स्वप्निल ढोबळे हा तणावात गेला होता. याच तणावातून त्याने स्वतःच्या शेतात कडूलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
स्वप्नीलने ढोबळे या विद्यार्थ्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई आणि एक भाऊ आहे. दरम्यान, २१ वर्षाच्या स्वप्नीलने आत्मत्या केल्याच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.