देसाईगंज : सेफ्टी क्लिनर टॅकरच्या धडकेत बैलबंडीवरील युवक ठार, एकजण जखमी

467

– संतप्त नागरिकांनी टॅंकर पेटविला
The गडविश्व
ता.प्र. देसाईगंज, २ नोव्हेंबर : शेतातील काम आटूपून घराकडे परतणाऱ्या बैलबंडी ला सेफ्टी क्लिनर टॅंकरने धडक दिल्याने झालेल्या अपघात बैलबंडीवरील युवकाचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी सेफ्टी क्लिनर टॅकर पेटविला. रोशन माणिक वाढई (२०) असे मृतक युवकाचे नाव आहे तर माणिक वाढई (५४)असे जखमी वडीलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एबी २३ व्ही ६६४७ क्रमांकाचा सेफ्टी क्लिनर टॅंकर देसाईगंजवरून आरमोरीकडे जात होता. दरम्यान शेतातून परत गावाकडे जात असलेल्या बैलबंडीला सेफ्टी क्लिनर टॅंकरने धडक दिली यात रोशन वाढई गंभीर जखमी झाला तर वडील किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी सेफ्टी क्लिनर टॅंकरला पेटविले. देसाईगंज पोलीसांनी घटनास्थळ गाठून संतप्त नागरिकांना आटोक्यात आणले. जखमींना देसाईगंज येथील रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्रो ९ वाजताच्या सुमारास रोशनचा मृत्यू झाला. अपघातात बैलांनाही दुखापत झाली. अपघात होताच टॅंकर चालक हा घटनास्थळावरून पसार झाला. देसाईगंज पोलीसांनी सेफ्टी क्लिनर टॅकर चालकाविरोधात गन्हा दाखल केला आहे.

#accident #gadchirolinews #desaiganj #roadaccident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here