देसाईगंज : जागतिक महिला दिनानिमीत्य वित्तीय साक्षरता कार्यक्रमांचे आयोजन

247

The गडविश्व
देसाईगंज : स्थानिक नगर परिषद व महिला आर्थीक विकास महामंडळ द्वारा संचालित तेजोमय लोकसंचालित साधन केंद्र वडसा च्या वतीने दिनदयाळ अंत्योदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत स्थापन महिला बचत गटांकरीता जागतीक महिला दिनानिमीत्य आज ८ मार्च रोजी स्थानिक माता वार्डातील समाज भवन येथे आर्थीक साक्षरता वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देसाईगंज नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते तर प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक महेश गेडाम, युनीयन बॅक ऑफ ईंडियाचे शाखा व्यवस्थापक रॉकेश भोयर, भारतीय स्टेट बँकेचे सहायक शाखा व्यवस्थापक अनुराग बोरकर, आय.डी.बी.आय.बँकेचे प्रतिनिधी रोशन सयाम, नगर परिषदेचे पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आशिष गेडाम, सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे, तेजोमय लोकसंचालित साधन केंद्र वडसा च्या अध्यक्ष गीताबाई मस्के, व्यवस्थापक कुंदा मामीडवार, कार्यकारणी सदस्य चंदाताई सहारे, शहीद जवान प्रमोद भोयर यांची आई अनीता महादेव भोयर, कोंढाळाच्या सरपंचा अपर्णाताई राउत, पोलिस पाटिल किरणताई कुम्भलवार, आराधना वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष, ज्योत्सना लुटे, उडाण वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष सरिता ढोरे, श्रमलक्ष्मी वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष सुजाता भीलकर,क्रांती वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष मीराबाई बाई घुटके, कलश वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष नाजेदा पठान, नारीशक्ति वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष कविता टीचकुले ई.मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पाहूण्यांनी राजमाता जीजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेसमोर दिपप्रज्वलित करुन माल्यांर्पन केले व नगर परिषदेच्या वतीने वृक्षारोपन करुन माझी वसुंधरा अंतर्गत वसुंधरेचे रक्षण करणेबाबत शपथ घेण्यात आली. त्यानंतर तेजोमय लोकसंचालित साधन केंद्र वडसा च्या वतीने शहीद जवान प्रमोद भोयर यांची आई अनीता महादेव भोयर व माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
याप्रसंगी मान्यवरांनी जागतीक महिला दिनाचे महत्व विषद केले तसेच वित्तीय साक्षरता, विमा योजना तसेच बँक कर्ज प्रकरण तयार करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत सहायक शाखा व्यवस्थापक अनुराग बोरकर यांनी मार्गदर्शन केले . तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे यांनी केंद्र शासनाच्या पी.एम.एफ.एम.ई. योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा शालुताई दंडवते म्हणाल्या की, आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने त्यांचे खांदयाला-खांदा लावुन कार्य करीत असुन त्या कुठेही मागे नाहीत परंतू समाजात महिलांना अजुनही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते परंतू या सर्व अडचणींवर मात करुन आजची महिला पुढे येत असुन समाजानी सुध्दा त्यांना सहकार्य करुन तीला पुढे जाण्यास प्रोत्साहित करुन समानतेची वागणूक द्यावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन माविमच्या क्षेत्र समन्वयक अर्चना मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समुदाय संघटक अरुण मोटघरे, सहयोगीनी आशा खरकाटे, सिंधु रामटेके, जयश्री जुमनाके व ईतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास नगर परिषदेअंतर्गत स्थापन महिला बचत गटांतील बहूसंख्य महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here