देसाईगंज : गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

397

– देसाईगंज तालुक्यातील चोप येथील घटना

The गडविश्व
देसाईगंज : सततची नापीकी व कर्जजाबारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील चोप येथे काल ४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मनोहर नकटू राऊत (६२) रा. चोप असे मृतकाचे नांव असुन या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मनोहर नकटू राऊत यांनी खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करून स्वतःची शेती तसेच भाडेतत्त्वावर घेतलेली. दोन एकर अशी जवळपासा ३ ते ५ एकर शेती करायचे. सततची नापिकी , पुरेशा प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने मोठया कुटूंबाचे पालनपोषण देणेदारांचे देणे या विवंचनेत होते. गेल्यावर्षीच लहान मुलाचे लग्न झाले. त्याच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणेही शक्य झाले नाही. याहीवर्षी अवकाळी पावसाने दगा दिल्याने ४ बांध्यातील उदीड मुंग तुर पिक पार मुईसपाट झाले. यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेल्याने मनोहर नकटू राऊत यांनी काल पहाटे ४.३० च्या सुमारास आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या पश्चात तिन मुले आणि चार नातु आहेत. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गावडे, बिट जमादार मिरगे, शिपाई आनंद पिठलेवाड हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here