देसाईगंज : अखेर काँग्रेसचा घागर मोर्चा नगर परिषदेवर धडकला

565

– आठ दिवसात समस्या निकाली काढण्याचे मुख्याधिकारी यांची हमी
The गडविश्व
देसाईगंज : मागील दिड महिण्यांपासुन शहराच्या हनुमान व राजेंद्र वार्डात नारु सदृश्य व दुर्गंधी युक्त पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतानाच टँकरनेही जंतुयुक्त पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येताच देसाईगंज तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर घागर मोर्चा नगर परिषदेवर धडकला.
दरम्यान शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन आठ दिवसात संपुर्ण शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची हमी मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली असल्याने तुर्तास घेराव आंदोलन मागे घेण्यात आला.
देसाईगंज शहराच्या हनुमान व राजेंद्र वार्डात नळाच्या पाण्यातुन नारु सदृश्य व दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत असल्याचे निदर्शनास येताच देसाईगंज शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन समस्या मार्गी लावण्या संदर्भात लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या पाण्यातही जंतु आढळून आल्याने नगर प्रशासन तब्बल दिड महिण्यांपासुन नागरिकांच्या आरोग्याशी खिलवाड केल्या जात असल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती समोर येऊनही याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने एकुणच नगर परिषदेचा पुरता मनमानी व भोंगळ चव्हाट्यावर येऊ लागला होता.
दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करुन समस्या तत्काळ मार्गी लावण्या संदर्भात लक्ष वेधूनही स्थिती जैसे थेच असल्याने देसाईगंज शहर
युवक कॉंग्रेसच्या वतीने या विरोधात आक्रमक पवित्रा घेत नगर परिषदेवर घागर मोर्चा काढून घेराव आंदोलन करण्याचे आयोजीत करण्यात आले होते. त्यानुसार आज येथील नैनपुर मार्गांवरील युवक कॉंग्रेस कार्यालयापासुन नगर परिषदे पर्यंत घागर मोर्चा काढून घेराव आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांनी मोर्चाला सामोरे जात समस्या शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याची हमी दिली.
मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदु नरोटे व युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी केले असुन यावेळी अल्पसंखांक जिल्हा अध्यक्ष लतीफ रिजवी, महिला तालुका अध्यक्ष आरती लहरी
सुनील सहारे क्षीरसागर शेंडे, संजय बन्सोड, सगो गोविंदा चिंचोळकर, संजय रामटेके, कैलास बन्सोड, अशोक देशमुख, राजू राऊत, गोपाल दिघोरे, गोपी भानारकर, सुनिल चिंचोळकर, भूमीत मोगरे, भारत गराडे, मंदबाई पेंद्रे, सुनीता बावणे, मीना चौधरी, वैशाली दिघोरे, प्रीती लेनगुरे, अश्विनी राऊत, मोहिनी दिघोरे, विजया दिघोरे, पुष्पा वाघाडे, निशा भानारकर, पिंकी लेनगुरे,रोहिणी कुथे, ममता बुल्ले, स्नेहा भागडकर, शीतल भानारकर,नंदा राऊत, रक्षा चौधरी, आशा सुरणकार, जयश्री लेनगुरे, संगिता धोटे, नाजूका कोल्हे, नीता अवसरे, निशा वाडरे, मंगला आलोने, रेखा आलोने आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here