– विद्यार्थ्यांनी घेतली सद्भाभावनेची शपथ
The गडविश्व
देसाईगंज, २० ऑगस्ट : विविधतेने नटलेला आपला भारत देश अनेक जाती-धर्म, विविध संस्कृती, भिन्न वेशभूषा, निसर्गाने सौंदर्याची उधळण करून सजवलेला सुपीक भूप्रदेश अशा बिरुदांनी समृध्द आहे. या देशात संपूर्ण जनता गुण्यागोविंदाने नांदत आहे, याचे एकमेव कारण देशातील सामाजिक सलोखा हेच आहे. देशाच्या उन्नतीसाठी हा सलोखा राखणे यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी कार्य करावे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. श्रीराम गहाणे यांनी केले.
स्थानिक आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २० आगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ दरम्यान होऊ घातलेल्या सामाजिक ऐक्य पधंरवाडाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख प्रा.आर एम धोटे , प्रमुख मार्गदर्शक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे गडचिरोली जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.श्रीराम गहाणे , प्रा डॉ राजू चावके, प्रा अमोल बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश हलामी यांनी केली.
प्रास्ताविकानंतर सर्वांना सदभावना शपथ देण्यात आली. अखिलेश सहारे बी.ए.भाग ३ यांनी सद्भावना दिवस प्रतिज्ञा वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. धोटे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन कु चेतना कोरे बी.काॅम ३ तर आभार प्रदर्शन कु.यास्मीन सय्यद बी.कॉम ३ हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक स्वयंसेविकांनी सहकार्य केले.
