देशभरात दुखवटा : गडचिरोली शहरात झडकले पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे बॅनर

669

– वाढदिवस 9 तारखेला, हौशी अतीउत्साही कार्यकर्त्यांकडून शहरात आज दुपारपासूनच बॅनरबाजी

The गडविश्व
गडचिरोली: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून देशभरात दोन दिवसांचा दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. मात्र असे असतांनाही पालमंत्र्यांचा वाढदिवस 9 तारखेला असतांना सुध्दा गडचिरोली शहरातील मुख्य चौकात आज दुपार पासून मोठ मोठे बॅनर लावण्यात आले होते यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्व देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशभरात आज आणि उदया असे दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर खाली घेतला जाणार आहे. व उदया राज्य सरकारतर्फे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दोन दिवस दुखवटा असतांनासुध्दा शहरातील काही हौशी कार्यकर्त्यांकडून शहरातील मुख्य चौकात आज दुपारच्या सुमारास पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी करण्यात आली होती. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी आहे. आज शासनातर्फे संपुर्ण भारतात दोन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला असतांना सुध्दा अतीउत्साही कार्यकर्त्यांना याचा विसर पडला का असे बोलल्या जात होते. एकीकडे दुखवटा आहे तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे का ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केल्या जात असून मुख्य चौकात पालकमंत्र्याचे मोठमोठे बॅनर झडकल्याने सर्वांचे लक्ष बॅनर कडे जात होते याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here