देवलमरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आविसचे हरीश गावडे बिनविरोध

207

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या निवडुका फेब्रुवारी महीन्यात पार पडल्या. सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली होती.
अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत देवलमरी येते सरपंच व उपसरपंच राष्ट्रवादी पक्षाचे होते. मात्र उपसरपंच यांच्यावार अतिक्रमण केले असल्याच ठपका ठेवून तक्रार दाखल करण्यात आल्याने त्यांचे सदस्यत्व् रद्द झाले त्यामुळे उपसरपंच पदा रिक्त होते व सदर उपसरपंच पदाची निवडनूक आज पार पाडली.
या निवडनूकीत आविस चे हरीश गावडे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली.
आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात उपसरपंच निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, ग्राम पंचायत सदस्य विमला कुर्री, विद्या राऊत, संजुबाई आत्राम, लक्ष्मण आत्राम, महेश लेकूर, माजी उपसरपंच जगनाथ मडावी, श्रीनिवास राऊत, इस्पात गावडे, संजय गौडेवार, दिवाकर गावडे, संपत आईलवार, विजय पीलीवार, तिरुपती गावडे, संदीप दुर्गे, कैलाश दुर्गे, तिरुपती लेकूर, सुधाकर लेकूर, दिलीप मडावी,पंकज कूसराम,प्रसाद कोपूलवार,शंकर बोरकुट,संतोष दहागावकर,राहुल आलाम,सत्यम रामगिरी,किशोर आलामसंदीप गावडे,प्रकाश मेश्राम,नरेंद्र गरगम,होते.
यावेळी पीठासिन अधिकारी म्हणून नायब तहसीलदार डी.खोत, ग्राम सेवक, उपस्थिति होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here