दुर्गम भागातील ६०४६ विद्यार्थ्यांनी गिरविले व्यसनमुक्तीचे धडे

524

-सिरोंचा तालुक्यातील ८८ शाळांमध्ये उपक्रम

The गडविश्व
गडचिरोली : व्यसनापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवत व्यसनमुक्त विद्यार्थी घडविण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ अभियानाने विशेष कार्यक्रम सुरु केले आहे. या अंतर्गत सिरोंचा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ८८ शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत जागृती करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून एकूण ६०४६ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे धडे गिरविले.
सिरोंचा तालुक्यातील ८८ शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला.
सिरोंचा तालुक्यातील नगरम, बामणी, मद्दीकुंठा, बोरामपल्ली माल, आरडा, मेडाराम चक, रंगयापल्ली, तमंडळा माल, जाफ्राबाद चक, वेंकटापुर, गुमलकोंडा, विट्ठलरावपेठा माल, नरसयापल्ली, कोटापल्ली री, असरअल्ली, जानमपल्ली, राजन्ना पल्ली, पेंटीपाका चक, राजेश्वरपल्ली चक, पेंटीपाका, गुमलकोंडा री,येल्लामाल, नंदीगाव चक, राजेश्वरपल्ली चक, आदिमूतापूर, रंगयापली, कोटापली री, अंकिसा माल, बामणी, नंदीकुडा, रामकृष्णपूर, राघवनगर, अमरावती, लक्ष्मीदेवी पेठा, तुमनूर माल, कोट्टमल, कारसपल्ली माल, कंबलपेठ चक, सिरकोंडा चक २, अमरावती माल, मोयाबीनपेठा, नरसयापल्ली, चिंतरेवला, कारसपल्ली माल, रोमपल्ली, गोलागुडम चक, विठलरावपेठा चक, राजीवनगर, पातागुडम, सोमनपल्ली माल, आरडा, राजना पल्ली, मादीकुंठा, तमंडला माल, मारिगुडम, झिंगानूर चक न २, झिंगानूर माल, मुत्तापूर चक, कोत्तागुडम, चित्तूर री, किष्टयापल्ली, कारंजेल्ली री, रमेशगुडम, कोर्ला माल, कोपेला, रामणीपुर चक, पोचमपल्ली री, नंदीकुडा, कोट्टागुडम, वेनलया माल, अमडेली, गंगनूर, चिंताईपल्ली, माडेरम री, कोठा पॅच, येडसील, पेंडालया, झिंगानूर चक १, पुल्लीगुंडम, मंगीगुड्डम री या गावांमधील एकूण ८८ शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात एकूण ६०४६ विद्यार्थिनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here