– एटापल्ली तालुक्यातील ६८ शाळांमध्ये कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील विविध ६८ शाळांतील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याचे धडे देण्यात आले. मुक्तिपथ अभियानातर्फे तंबाखू व दारूच्या व्यसनाबाबत गावातील १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे या उपक्रमात एकूण ५२६६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग व्यसनमुक्त राहण्यासंदर्भात धडे गिरविले. दरम्यान तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता करण्यात आली. गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसननाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. गावाचा नकाशा काढून त्यात दारूची ठिकाणे, दुकान, पानटेले, गावातील शाळा, समाज मंदिर व इतर ठिकाण तयार करून ओळखीसाठी चिन्हांकित करण्यात आले. त्यांनतर गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. व्यसनमुक्त गाव निर्माण करण्यासाठी बाल सैनिकांची निवड करण्यात आली, तंबाखूजन्य पदार्थांची होळी करणे इत्यादी उपक्रम घेत तंबाखू व दारूच्या दुष्परिणामासंदर्भात जागृती करण्यात आली.
सदर उपक्रम चंदनवेली, उडेरा, पंदेवाही, कसनसूर, गेदा, पेठा, गुरुपल्ली, वाघेझरी, जारावंडी, दिंडवी, दोड्डी, तांबडा, दुमे, बारसेवाडा, बुर्गी, हेड्री, परसलगोंदी, हालेवारा, गुंडम, घोटेसुर, आलेंगा, सिनभट्टी, येमली, तोडसा, तुमरगुंडा, एकारा, भापडा, वाडसकाळा, दोड्डी म, वाटेगट्टा, वडसा खु, गट्टा स, नेंदर, जांभीया, मंगर, करेम, आलदंडी, एकारा खु, जवेली, कांदोळी, पैमा, कोठी, कोटमी, परसलगोंदी, बिर्डी स, सेवारी, सारखेडा, हालेवारा, पन्नूर, कसुरवाही, कोहका, गर्डेवाडा, वेनासर, जारावंडी, मलमपडू, दोलंदा, सिरपूर अशा ५७ गावे व एटापल्ली शहरातील एकूण ११ वार्डांममधील शाळांमध्ये घेण्यात आला. या उपक्रमात ५२६६ सहभागी झाले होते.