– धानोरा शहरातील महिलांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : धानोरा शहरातील वार्ड क्रमांक १२ मधील मुजोर दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा ईशारा धानोरा शहरातील संघटनेच्या महिलांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन एपीआय गायकवाड यांनी स्वीकारले.
धानोरा शहरात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. दारू पिणाऱ्या व्यक्तींकडून महिलांना त्रास होत आहे. दारू विक्रेत्याकडून दारूबंदी संघटनेच्या महिलांना धमकी दिली जाते. मुले दारूच्या व्यसनामुळे बरबाद होत आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी. शहरातील दारू आठ दिवसात बंद न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल. असाही इशारा निवेदनातून शहर संघटनेच्या महिलांनी दिला आहे. सोबतच शहरातील दारूविक्रेत्यांची यादी धानोरा पोलिस स्टेशनला सादर करण्यात आली आहे.