दाऊद इब्राहिमची माहिती द्या २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळवा

865

– NIA कडून मोठी घोषणा

The गडविश्व
मुंबई, १ सप्टेंबर : दाऊद इब्राहिमसंदर्बात जो कोणी दाऊदची माहिती देईल त्याला 25 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. अशी मोठी घोषणा NIA कडून करण्यात आली आहे. तर दाऊदच नाही तर त्याच्या साथीदारांचीही माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक साथीदारावर वेगवेगळी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
भारतात सगळ्या काळ्या धंद्यांमध्ये दाऊद इब्राहिमचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स, हत्यारे, स्फोटके अशा अनेक धंद्यामागे त्याचे हात असल्याने फुस मिळते आहे. ज्यातून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे दाऊदची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे NIA कडून सांगण्यात आले आहे.
इब्राहिमचा भाऊ हाजी अनीस, त्याचा खास जावेद पटेल ऊर्फ जावेद चिकना, छोटा शकील आणि इब्राहिम मुस्ताक अब्दुल रज्जाक मेनन ऊर्फ टायगर मेनन यांची माहिती देणाऱ्यांनाही बक्षीस देण्यात येणार आहे. छोटा शकीलवर २० लाख आणि उर्वरित अनीस, चिकना, मेननवर १५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here