दहा लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून

302

The गडविश्व
गोंदिया : दहा लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय बालकाचा गळा आवळून खून केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोदा येथील शेतशिवारात काल बुधवार २३ फेबुवारी रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली. चेतन नरेश खोब्रागडे (१७) रा. बनगाव ता. आमगाव असे मृत बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चेतन खोब्रागडे हा मावशीच्या घरी रिसामा येथे जाण्यासाठी निघाला. परंतु रात्री घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध करुन विचारपूस केली. मात्र त्याचा शोध लागला नाही. मुलगा घरी न परतल्यामुळे वडीलाने रात्री आमगाव पोलीस स्टेशन येथे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार केली. दरम्यान रात्रीच चेतनचे अपहरण केले. त्यासाठी १० लाख रूपयाची खंडणी द्या अशी मागणी केली होती.
खंडणीसाठी आलेल्या फोनबाबत तपस केला असता सदर फोन दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (२४) रा. नवेगाव खैरलांजी (मध्यप्रदेश) याचे असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करीत घटनास्थळ गाठले. पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले होते. बोदा येथील शेतात असलेल्या तणसीच्या ढिगाऱ्यात मृतदेह ठेवला होता. त्याची चप्पल तणसाच्या ढिगाऱ्याच्या बाहेर मिळाली. त्या चप्पलजवळ जाऊन श्वान थांबला. पोलिसांनी तणसीच्या ढिगाऱ्यात शोध घेतला असता चेतनचा मृतदेह आढळला. चेतन हा आयटीआयमध्ये शिकत होता. या घटनेसंदर्भात आमगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here