The गडविश्व
मुंबई : कॉपी बहाद्दरांना शिक्षण मंडळाने दणका दिला आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत आतापर्यंत ४१ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉपी करतांना सापडल्याने शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी कॉपी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला एकाच दिवसात ४१ कॉपी बहाद्दर विद्यार्थी सापडले. राज्यात नऊ विभागीय मंडळात बारावीची परीक्षा सुरु आहे. रसायनशास्त्र, एमसीव्हीसी पेपर क्रमांक १ मध्ये २७ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. औरंगाबादमध्ये १५ , मुंबईत १, अमरावती ८, नाशिक १, लातूर २ अशी प्रकरणे आढळून आली. राज्यशास्त्र विषयात १४ कॉपीची प्रकरणे सापडली. अमरावती विभागात सर्वाधिक १२, औरंगाबाद १, लातूर १ याप्रमाणे प्रकरणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.