दंतेवाडा पोलिसांसमोर तीन नक्षल्यांचे आत्मसमर्पण : ‘लोन वर्राटू’ मोहिमेला यश

292

– २ जणांवर होते प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस
The गडविश्व
दंतेवाडा : पोलिसांसमोर आज तीन नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दंतेवाडा पोलिसांनी राबवलेल्या ‘लोन वर्राटू’ मोहिमेला यश मिळत आहे.
या नक्षल्यांनी सीआरपीएफचे डीआयजी विनय कुमार, दंतेवाडा एसपी सिद्धार्थ तिवारी, अतिरिक्त एसपी राजेंद्र जैस्वाल, सीआरपीएफचे अतिरिक्त कमांडिंग अधिकारी अरुणकुमार सज्जा, ब्रजेश कुमार पांडे, असिस्टंट कमांडंट, आशा राणी पोलीस सेक्शन ऑफिसर बरसूर यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांमध्ये दशरथ उर्फ ​​कोटलो मांडवी (डीकेएबीएस अध्यक्ष), एक लाखाचे बक्षीस असलेले मंगडू नुप्पो (केएबीएस अध्यक्ष) आणि मोटू कुहादमी (मिलिशिया सदस्य) यांचा समावेश आहे. आत्मसमर्पण केलेल्या तिन्ही नक्षल्यांचा विविध नक्षली घटनांमध्ये सहभाग आहे. ‘लोन वर्राटू’ मोहिमेमुळे नक्षल्यांना मोठा झटका बसला आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 515 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. दोन दिवसांपूर्वी ९ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here