तो परत आला… गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा बळी

1946

– सततच्या घटनेने नागरिक दहशतीत

The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑगस्ट : जिल्हा मुख्यालयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या बोदली येथील इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज ६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघकीस आली. मारोती निंबाजी पिपरे अंदाजे वय ६० वर्ष असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मारोती पिपरे हे गावालगतच्या झुडपी जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेले होते. दरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला करून नरडीचा घोट घेतला. सायंकाळ होवूनही मारोती पिपरे हे घरी न परतल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता गावानजीकच्या तलावाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती वनविभाग व पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस व वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
जिल्हा मुख्यालयानजीक सततच्या अशा घटना घडत असल्याने नागरिक दहशतीत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here