तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट, महिला दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

542

The गडविश्व
-सिरोंचा पोलिसांची कारवाई
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अमरावती शेतशिवारात सिरोंचा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या धाड टाकून तीन ड्रम गुळाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई मंगळवारी केली. या प्रकरणी महिला दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरावती येथील अवैध दारूविक्री करणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी आताही जवळपास पाच विक्रेते सक्रिय आहेत. गावातील एकाने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती गाव संघटनेकडून प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून हातभट्टी उध्वस्त केली व मिळून आलेला तीन ड्रम सडवा सुद्धा नष्ट करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजू चव्हाण व पोलिस कर्मचाऱ्याची केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here