तरुणावर मधमाशांचा हल्ला ; जीव वाचवण्यासाठी कालव्यात मारली उडी

1057

– कालव्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणाचा मृत्यू

The गडविश्व
भंडारा : मधमाशांच्या झालेल्या हल्ल्यात आपला जीव वाचविण्यासाठी कालव्यात उडी मारली परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात घडली घडली. महेश रेवतकर (२५) असे मृतक तरुणाचे नाव आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक तरुण हा चारचाकी वाहनाने आपल्या शेतात जात होता. दरम्यान अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत गोसे धरणाच्या कालव्यात उडी मारली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याला पाण्याबाहेर निघता आले नाही व पाण्यात बुडून मृत्यू झाला. कालव्यात मृतदेह आढळल्याने सदर घटना उगजडकीस आली. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.तसेच पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पवनी येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचा पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे. या घटनेमुळे रेवतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here