तब्बल ४८ लाख रुपये किंमतीचे ३ हजार हिरे जप्त

418
File Photo

The गडविश्व
पुणे : पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाईत करत तब्बल ३ हजार हिरे जप्त केले आहेत. विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाची तपासणी करतांना हे हिरे आढळून आले आहेत. जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत तब्बल ४८ लाख ६६ हजार इतकी आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या व्यक्तीकडे हे ३ हजार हिरे आढळून आले आहेत तो व्यक्ती शारजाह येथून आला होता. एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर या व्यक्तीच्या तपासणीत हिरे आढळून आले. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
शाहजाह येथून हिऱ्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती एअर इंटेजिजन्स युनिट, पुणे विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी आपला सापळा रचला होता. त्यानुसार विमानतळावर सर्व प्रवाशांची तपासणी सुद्धा सुरू होती.
ज्या व्यक्तीकडे हे ३ हजार हिरे आढळून आले आहेत त्यांची बाजारभावानुसार एकूण किंमत ४८ लाख ६६ हजार इतकी आहे. हे हिरे ७५ कॅरेट वजनाचे असल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने हे हिरे आपल्या सामानात लपवून ठेवले होते. या प्रकरणी आता आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here