तंमुस च्या पुढाकाराने प्रेमी युगल अडकले विवाह बंधनात

778

The गडविश्व
चिमुर, २३ ऑगस्ट : तालुक्यातील कोलारा (तु) येथील येथील तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमी युगल विवाह बंधनात अडकले आहे. वर आकाश मारोती श्रीरामे रा. कोलारा व वधु ममता रविंद्र घरत रा. कोलारा (तु) असे प्रेमी युगलाचे नाव आहे.
आकाश चे गावातीलच ममता शी काही वर्षापासुन प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले मात्र घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनीही गावातील महात्मा गांधी तंटामुक्त समिती कडे धाव घेतली. तंटामुक्त समिती अध्यक्ष रतिराम डेकाटे यानी ग्राम पंचायत कार्यालयात तातडीची सभा घेऊन या प्रेमी युगलाचा विवाह करून देण्याचे एकमताने ठरले. दरम्यान १९ ऑगस्ट रोजी या प्रेमी युगलाचा रीतसर विवाह लावून देण्यात आले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रतिराम डेकाटे, सरपंचा शोभाताई कोयचाडे, उपसरपंच सचिन डाहूले, सदस्य गणेश येरमे, अविनाश गणविर, अरुणा चौधरी, विठल ननावरे, जनार्धन वैद्य, संजय गुळ्धे, प्रफुल वाघमारे, शत्रुघन दडमल, अमोल गणविर, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here