– टीईटी घोटाळ्यातुन २३४ कोटींहून अधिक रक्कम कमावल्याचा अंदाज
The गडविश्व
पुणे : टीईटी नकली प्रमाणपत्रातून पाच जणांनी 234 कोटींहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पडताळणी न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी पडताळणी न करता ही सर्टीफिकेट घेतली ते शिक्षणाधिकारी आता रडारवर आहेत.
7900 उमेदवारांकडून 2 ते 3 लाख रूपये वसूल केल्याची माहिती उघड होत आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकरला अटक झाली. फरार एजंटचा शोध सुरु आहे. दरम्यान, टीईटी पेपरफुटीप्रकरणी (TET Exam) जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे.