– रंगभूमी गाजवणारे सुमारे १३० कलावंत झळकणार
The गडविश्व
गडचिरोली : विदर्भात लोकप्रीय असलेल्या झाडीपट्टी नाटकावर आधारित असलेल्या ‘झॉलीवूड’ चित्रपट उदया ३ जून रोजी महाराष्ट्रातील सुमारे ४०० चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून झाडीपट्टी नाटकाविषयी लोकांना कळणार असून झाडीपट्टी रंगभूमीचे दर्शन घडणार आहे.
विदर्भात लोकप्रिय असलेल्या झाडीपट्टी नाटकांविषयी उर्वरित महाराष्ट्रात विशेष माहिती नाही. मात्र उदया प्रदर्शित होत असलेल्या ‘झॉलीवूड’ चित्रपटाच्या रूपात जगभरात पोहोचणार आहे. बऱ्याच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट उदया ३ जून रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ऑस्करसाठी निवडल्या गेलेल्या ‘न्यूटन’ चित्रपटाचा कलादिग्दर्शक तृषांत इंगळे यांनीे केले आहे. या चित्रपटाची कथा व पटकथा झाडीपट्टी कलावंत आसावरी नायडू तसेच तृषांत यांची आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे झाडीपट्टीवरचे खरेखुरे कलाकार आणि यापूर्वी कधीच अभिनय न केलेले सर्वसामान्य लोक चित्रपटातील भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात झाडीपट्टी रंगभूमी गाजवणारे सुमारे १३० कलावंत झळकणार आहे. या चित्रपटात झाडीपट्टीतील स्वरबहार म्हणून ओळखल्या जाणारे युवराज प्रधान सुध्दा असून त्याचा ‘हसरा चेहरा’ हे गाणे या चित्रपटात आहे. तसेच विनोदी कलावंत के. रवीकुमार सुध्दा या चित्रपटात दिसणार आहे. तर चित्रपटाची कथा व पटकथा नाटयकलांवत आसावरी नायडू सुध्दा चित्रपटात दिसणार आहे.
झाडीपट्टीतील नाटक कसे असते, तेथील नृत्य, गाणी, अभिनय, तांत्रीक बाबी, कलाकारांचा अभिनय, प्रेक्षक, प्रवास, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण कसे चालते हे या ‘झॉलीवूड’ चित्रपटातून लोकांना कळणार आहे. झाडीपट्टीतीज दीडशे वर्ष जूनी संस्कृती जशीच्या तशी या चित्रपटातून बघायला मिळेल असे आसावरी नायडू म्हणाल्या. या चित्रपटात झाडीपट्टीमध्ये बोलली जाणारी झाडीपट्टी मधील ग्रामीण बोली भाषा वापरण्यात आली आहे. काही गावकरीही या चित्रपटात बघायला मिळतील. सिंदेवाही पट्टयातील मरेगाव, वडसा, देसाईंगज भागात ‘झॉलीवूड’ चित्रपटाचे सुमारे २५ दिवस चित्रीकरण करण्यात आले आहे.
झाडीपट्टीमधील सर्वांनी हा चित्रपट पहावा : होमदेव कोसमशिले (नाट्य कलावंत, झाडीपट्टी प्रसिद्ध युटूबर)
– झाडीपट्टीवर आधारित ‘झॉलीवड’ हा चित्रपट उदया ३ जून रोजी महाराष्टातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड, हॉलीवूड, टॉलीवूड ऐकले. पण आता झाडीपट्टीवर आधारीत ‘झॉलिवूड’ हा चित्रपट ऑस्करसाठी निवडल्या गेलेल्या ‘न्यूटन’ चित्रपटाचा कलादिग्दर्शक तृषांत इंगळे यांनीे केले आहे. आतापर्यंत आपण झाडीपट्टीतील नाटके बघत आला आहात मात्र झाडीपट्टीतील दीडशे वर्ष जूनी संस्कृती जशीच्या तशी या चित्रपटातून बघायला मिळणार आहेत. या चित्रपटात झाडीपट्टी मधील ग्रामीण बोली भाषा वापरण्यात आली असून प्रत्येक कलावंतांनी जीव ओकुन आपली दाखविली आहे. तरी हा चित्रपट झाडीपट्टीतील प्रत्येक रसिक मायबापांनी आवर्जून बघावा व चित्रपटाला भरघोस असा प्रतिसाद दयावा.