– युवा गोंडवाना क्रीडा मंडळ ताटीगुडम यांच्या वतीने भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ताटीगुडम येथे युवा गोंडवाना क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून होता तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पं .स.सदस्या सौ.सुरेखा आलाम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, रेपनपली ग्राम पंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे, सौ.प्रणाली मडावी, छाया सड़मेक, माजी उपसरपंच संजय पोरतेट, प्रतिष्ठित नागरिक गंगाराम मडावी, रमेश सिडाम, सीताराम मडावी, सीताराम गावडे, राजू आत्राम, तिरुपती आत्राम, वासुदेव सिडाम आदि मंचावर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गावडे, राकेश आलाम, अनिल कोडापे, सूरज चलकलवार, सूर्यकांत मडावी, रविंद्र मडावी आदि उपस्थित होते.
