जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार सुसाट ; पूरपीडीतांना जीवनावश्यक वस्तुंच्या किट्सचे केले वाटप

460

The गडविश्व
अहेरी, १६ जुलै : मागील आठवड्यापासून मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. अहेरी तालुक्यातील नागेपली, मोदुमडगु येथे पाण्याने वेढा घालून दिला त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अचानक आलेल्या पुरामुळे घरात असलेल्या जीवनावश्यक वस्तु पाण्यात भिजून वाहून गेल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नेहमीप्रमाणे मदतीचा हात पुढे करत नागेपली, मोदुमडगु येथील पूर पीडित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स चे वाटप केले. त्यामुळे सत्ता असो अथवा नसो मात्र माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार एकदम सुसाट चालले आहे. जीवनावश्यक किट्सचे वाटप करतांना नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, अशोक रापेल्लीवार, माजी सरपंच सरोज दुर्गे, माजी पं.स.सदस्य योगेश्वरी मोहूर्ले, ग्रा.पं.फिलिक्स गीद्द, आशिष पाटील, ममता मडावी, अंजनाबाई पेंदाम, करिष्मा आत्राम, बेबी मंडल, राकेश कुडमेथे, ग्रामविकास अधिकारी वाळके, तसेच आविस कार्यकर्ते संतोष अग्रवाल, बंडू मोहूर्ले, दिलीप वडलकोंडावर, गणेश दुर्गे, किशोर दुर्गे, आतिष आत्राम, राहुल गुरनूले, लक्ष्मण मोहूर्ले, रोहित तररेवार, प्रभाकर मदनय्य गुरनुले, प्रथमेश सोनलवार, सनदुकवार, श्रीनिवास निकोडे, मुखत्यार शेख, तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here